बातम्या

उत्तम आरोग्य म्हणजे नेमकं काय.....?

What exactly is good health


By nisha patil - 11/6/2024 6:04:33 AM
Share This News:




जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने उत्तम आरोग्य म्हणजे  फक्त व्याधी, आजार मुक्त शरीरच नव्हे तर शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक व सामाजिक दृष्टया सुखकारक किंवा कल्याणकारी मानवी अवस्था म्हणजे आरोग्य.
             
समजा एखाद्या व्यक्तीचं शरीर व्याधी मुक्त आहे, त्याला कोणताही आजार नाही परंतु तो सतत कोणत्या न कोणत्या तणावाखाली असतो, कसलं तरी टेन्शन घेऊन वावरत असतो. एकादा कायमस्वरूपी रागीट, आदळआपट करत असतो, लालची किंवा लोभी असतात तर अशा व्यक्तीला निरोगी म्हणता येणार नाही.
               
आपल्याला जर अध्यात्मिक आणि सामाजिक आरोग्य जपायचं असेल तर  आपल्याला शारीरिक आरोग्या सोबतच आपण मानसिक आणि भावनिक आरोग्यावर तितकाच भर दिला पाहिजे तरच आपण  एक मानव म्हणून समाजाचा उत्कर्ष करू शकू.

मानसिक आरोग्य... 
मानसिक स्वास्थ्य म्हणजे अशी स्थिती जिथं ताण, तणाव, चिंता, नकारात्मक विचारसरणीला आपल्याला मनात स्थान नसेल.

भावनिक आरोग्य... 
भावनिक आरोग्य म्हणजे अशी संतुलीत स्थिती जिथं राग लोभ, अहंकार  व तिरस्काराला आपल्याला जीवनात स्थान नसेल.

अध्यात्मिक आरोग्य... 
अध्यात्मिक आरोग्य म्हणजे एकात्मता आणि सुसंवाद ने राहणं म्हणजेच अध्यात्मिक आरोग्य. आपल्या स्वतःच्या धर्म आणि परंपरागत चालीतीरी वर विश्वास असणे व दुसऱ्यांच्या धर्म व परंपरा चा आदर करणे म्हणजे अध्यात्मिक  आरोग्य व स्वास्थ.

शारीरिक आरोग्य... 
जेव्हा आपले शरीर कोणत्याही  प्रकारच्या व्याधी  पासून व शारीरिक इजे  व अनियमितते पासून मुक्त असतो  अशा स्थितीस उत्तम शारीरिक आरोग्य म्हणून ओळखलं जाते.

 


उत्तम आरोग्य म्हणजे नेमकं काय.....?