बातम्या

पावसाळ्यात निरोगी त्वचेसाठी डाएटमध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करावा.....?

What foods should be included in the diet for healthy skin during monsoons


By nisha patil - 7/15/2024 7:25:32 AM
Share This News:



१. सकाळी उठल्यानंतर...पावसाळ्यात दिवसाची सुरुवात लिंबू पाण्याने करावी. लिंबू पाण्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. याशिवाय ते त्वचेसाठीही ते फायदेशीर असते. सकाळी उठल्यानंतर लगेच एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करुन प्यावे. अर्ध्या तासानंतर तुम्ही भिजवलेले बदाम आणि मनुका खाऊ शकता. बदाम हे व्हिटॅमिन 'ई' चा चांगला स्रोत आहे. बदाम आणि मनुका त्वचेच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. 

२. नाश्ता...
पावसाळ्यात नेहमी पचायला हलका असणारा नाश्ता करावा. तुमची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही नाश्त्यात मूग डाळ चीला, लापशी, ओट्स   असे पदार्थ खाऊ शकता. 

३. मिड मॉर्निंग ब्रेकफास्ट... पावसाळ्यात आपण सहसा चहा, कॉफी किंवा भजी खाणे पसंत करतो. पण त्वचा निरोगी ठेवण्यासाठी या ऋतूत फळ आणि भाज्यांचे ज्युस पिणे अधिक फायदेशीर ठरेल. पावसाळ्यात आपण आवळ्याचा रस किंवा काकडीचा रस पिऊ शकता. ज्यूस प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि पाण्याची कमतरता दूर होते.

४. दुपारचे जेवण...
 पावसाळ्यात दुपारच्या जेवणात डाळ, भात किंवा चपाती, भाजी खाऊ शकता. याचबरोबर आपण जास्त खाणे टाळावे. दुपारच्या जेवणात सॅलडचा समावेश जरूर करावा. सॅलड त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. सॅलड खाऊन लठ्ठपणा नियंत्रणामध्ये ठेवता येतो. याशिवाय त्वचा निरोगी आणि तजेलदार बनते.

५. स्नॅक्स...
पावसाळ्यात आपल्याला समोसे, पिझ्झा इत्यादी चटपटीत पदार्थ स्नॅक्स म्हणून खायला आवडतात. पण फास्ट फूड खाल्ल्याने तुमचे आरोग्य आणि त्वचा दोघांनाही हानी पोहोचते. या ऋतूत तुमची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही भिजवलेल्या भोपळ्याच्या बिया स्नॅक्स म्हणून खाऊ शकता. याशिवाय पावसाळ्यात भोपळ्याचे सूप पिणेही खूप फायदेशीर असते. 

६. रात्रीचे जेवण...
रात्रीचे जेवण नेहमी हलके असावे. रात्रीच्या जेवणात तुम्ही खिचडी, मूग डाळ चीला किंवा डाळ, भात तसेच चपाती आणि भाजी खाऊ शकता.


पावसाळ्यात निरोगी त्वचेसाठी डाएटमध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करावा.....?