बातम्या

थायरॉंइड म्हणजे काय ?

What is Thyroid


By nisha patil - 1/5/2024 8:59:31 AM
Share This News:



थायरॉंइड या रोगा बद्दल जास्त जनजागृती नसल्यामुळे फार कमी लोकांना ह्या रोग बद्दल अचूक माहिती आहे. डाईबीटीस, कॅन्सर या सारख्या रोगान बद्दल जेवढी जनजागृती झाली आहे त्या तुलनेने ह्या रोगा ची फार कमी माहिती लोकांना आहे. त्या मुळे ह्या रोगाचे प्रमाण भारतात वाढले आहे.

थायरॉंइड म्हणजे नक्की आहे तरी काय ?

आपल्या शरीरात भरपूर एंडोक्राइन ग्लैंड्स (अंत: स्रावी ग्रंथि) असतात. ज्यानच काम असत हार्मोन्स तयार करण. त्या मध्ये थायरॉंइड हा एक आहे तो आपल्या मानेच्या मध्य भागी आढळतो. थायरॉंइड या मध्ये दोन प्रकारचे हार्मोन्स येतात T3 आणि T4 ,जे आपल्या शरीराचा मेटाबॉलिज्म नियंत्रित करतो. निरोगी माणसामध्ये ह्या हार्मोन्से प्रमाण नियंत्रित असते तर या उलट रोगी माणसामध्ये ह्याचे प्रमाण कमी किंवा जास्त होते यालाच थायरॉंइड डीसऑर्डर असे म्हणतात. थायरॉंइड हार्मोन्स ह्याचा परिणाम शरीरावर सर्वत्र म्हणजेच आपल्या हृदयावर, मेंदूवर आणि पचन क्रियेवर होतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला थायरॉंइडची व्याधी होते तेव्हा आपल्या शरीरात असणाऱ्या हार्मोन्स नियंत्रित केल्या जाणाऱ्या पीयूषिका आणि थायरॉइड ग्रंथिन मध्ये अडथळे निर्माण होतात.

थायरॉंइड डीसऑर्डर म्हणजे काय ?

थायरॉंइड ग्रंथिन मधून निघणाऱ्या T3 आणि T4 हार्मोन्स चे प्रमाण कमी आणि जास्त होणे म्हणजेच थायरॉंइड डीसऑर्डर  होय.

थायरॉंइड डीसऑर्डर चे प्रकार किती आहेत ?

जागरूक थायरॉइड (हायपरथायरॉइडिझम) :
रक्तात T3 आणि T4 प्रमाण अधिक असल्यास जागरूक थायरॉईड (हायपरथायरॉइडिझम) होतो.

सुप्त थायरॉइड (हायपोथायरॉइडिझम) :
रक्तात T3 आणि T4 प्रमाण कमी असल्यास सुप्त थायरॉइड (हायपोथायरॉइडिझम) होतो.

थायरॉंइड ची लक्षण कोणती आहेत ?

शरीराचे कमी तापमान.
जलद किंवा संथगतीने चालणारी नाडी.
असामान्यपणे कमी किंवा उच्च रक्तदाब.
असामान्यपणे मोठी किंवा लहान मान किंवा मानेतील गाठ.
घोगरा, कर्णकटू आणि कठोर आवाज.
खूप तहान किंवा भूक.        

आहार किंवा व्यायाम यामध्ये बदल केला नाही तरी लक्षात येण्याजोगा वजनातील बदल (वाढणे किंवा कमी  होणे)

इतरांना थंडी वाजत असते तेव्हा गरम होणे किंवा इतरांना गरम होत असते तेव्हा थंडी वाजणे.
हृदयाचे ठोके.
विचित्र पद्धत किंवा लय.
बद्धकोष्ठता किंवा अतिसार.
थकवा.
अशक्तपणा.

हायपोथायरॉइडिझमची काही लक्षणं :

आळस, थकवा, अंगदुखी, मंुग्या-पेटके येणं, सूज, केस गळणं, त्वचा जाड आणि कोरडी होण, औदासिन्य, बद्धकोष्ठ, आवाज घोगरा होण, नपंुसकत्व, मासिक सावात बदल, वंध्यत्व, गलगंड, चेहरा सुजणे, सांधेदुखी, मासिकपाळी संदर्भातील त्रास ( वेळेवर न येणे/जास्त रक्तस्त्राव होणे), प्रचंड झोप येणे, घट्ट शौच.

हायपरथायरॉइडझमची काही लक्षणं :

थकवा, भावनाशीलता, अस्वस्थपणा, थरथरणं, अशक्तपणा, छातीत धडधड, निदानाश, धाप लागणं, त्वचा गरम आणि ओलसर होण, वजन कमी होण, भुकेत बदल, मासिक स्त्रावात बदल, वारंवार गर्भपात, गलगंड, डोळे मोठे होणे, लाल होण, डोळ्यातून पाणी येण, थायरॉइड ग्रंथींचा आकार वाढणे, खाज सुटणे,पुरुषांमध्ये स्तनांची वाढ,शौचास जास्त वेळा जावे लागणे.

प्रत्येक वेळी सर्व लक्षणं असतीलच असं नाही. कोणतंही बाह्य लक्षण नसताना थायरॉइडचा विकार असू शकतो. नवजात अर्भकात आणि म्हातारपणी लक्षणांचा अनेकदा अभाव असतो. सर्व नवजात अर्भकात थारॉइडची चाचणी करणं अत्यावश्यक आहे.

थायरॉंइड कॅन्सर म्हणजे काय ?

थायरॉंइड कॅन्सरची सुरवात थायरॉंइड ग्रंथिन पासून होते. ह्या ग्रंथी तुमच्या मानेच्या खालच्या भागात असतात. थायरॉंइड कॅन्सर हा कोणत्याही वयोगटातील व्यक्तींन मध्ये आढळू शकतो.

थायरॉंइडची सौम्य गाठ हि कॅन्सर मध्ये मोडत नाही. कारण सौम्य गाठी मधील सेल हे पूर्ण शरीरामध्ये पसरत नाहीत आणि ह्या गाठी पासून आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारचा प्राणघातक धोका आढळत नाही. अनेकदा ९०% थायरॉंइडच्या गाठी ह्या सौम्य गाठ  या प्रकारात मोडतात.

थायरॉंइडची घातक गाठ  हि कॅन्सर मध्ये मोडते. हि बहुधा प्राणघातक हि ठरू शकते. ह्या कॅन्सर गाठीचे सेल आपल्या शरीरातील पेशींवर आणि विविध अंगावर हल्ला करतात आणि त्यांना नष्ट करतात.


थायरॉंइड म्हणजे काय ?