बातम्या

मधुमेह म्हणजे काय? तो कसा होतो?

What is diabetes How does it happen


By nisha patil - 7/5/2024 7:20:19 AM
Share This News:



मधुमेह म्हणजे काय?

मधुमेह एक अशी समस्या आहे ज्यात रक्तामध्ये साखरेचा स्तर नियंत्रित राहत नाही. आता तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की अचानक कशी साखर नियंत्रित होणे बंद होते? त्या आधी कशी काय साखर नियंत्रित व्हायची? 

चला जाणून घेऊया या दोन्ही प्रश्नांची उत्तरे..!

आपल्या शरीरात स्वादुपिंड(Pancriase)नावाची एक ग्रंथी असते. यातून इन्सुलिन नावाचं हार्मोन तयार होत असतं. हेच इन्सुलिन आपली शरीरातील रक्तात तयार होणाऱ्या ग्लुकोज वा साखरेची मात्रा नियंत्रित ठेवण्याचं काम करतं. पण शारीरिक बदलासह पेंक्रीयाझ इन्सुलिन तयार करू शकत नाही आणि साखरेचा स्तर वाढत जातो. शेवटी तो मनुष्य मधुमेहाला बळी पडतो.

मधुमेह शरीराला कसा त्रास देतो?

रक्तात ग्लुकोजची मात्रा वाढल्याने रक्तात उपस्थित घटकांचं संतुलन बिघडतं. जसं कि रक्तात पांढऱ्या रक्त पेशी (WBC) आणि लाल रक्त पेशी (RBC) असतात. यांच्यासोबतच प्लाझ्मा सुद्धा असतो. ऑक्सिजन सुद्धा रक्त प्रवाहासोबत शरीरात प्रवाहित होत असतं. पण जेव्हा रक्तात ग्लुकोजचा स्तर वाढत जातो तेव्हा लाल रक्त पेशी ज्या जखमेला लवकर भरण्याचं काम करतात. त्या ग्लुकोजची मात्रा वाढल्याने आपलं काम नीट पार पडू शकत नाहीत. पांढऱ्या पेशी ज्या आपल्या शरीराला रोगप्रतिकार शक्ती प्रदान करतात त्यांचा प्रभाव सुद्धा अतिग्लुकोजमुळे कमी होतो. यामुळे मधुमेहासोबत इतरही आजार आणि व्याधी शरीराभोवती विळखा घालू लागतात.

मधुमेहाची प्राथमिक लक्षण
◆ खूप भूक लागणे आणि थकवा जाणवने
◆ वजन झपाट्याने कमी होणे
◆ खूप तहान व भूक लागणे,
◆ वारंवार लघवीला होणे
◆अतिशय थकवा जाणवणे, 
◆सतत इन्फेक्शन होणे, 
◆ जखम लवकर बरी न होणे,
◆ दृष्टीदोष, धुरकट दिसणे, 

मधुमेह प्रकार

1).इन्सुलन वर अवलंबून नसणारे 
2) इन्सुलन वर अवलंबून राहणारे 


मधुमेह म्हणजे काय? तो कसा होतो?