बातम्या

अपचन होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्याल? :

What precautions should be taken to avoid indigestion


By nisha patil - 7/19/2024 7:44:49 AM
Share This News:




◼️ पाणी पिणे : जेवण करण्याच्या ३० मिनिटाआधी नेहमी पाणी प्या, उत्तम आरोग्यासाठी शरीर नेहमी हायड्रेट ठेवण्याचा सल्ला दिला जातो. कारण अशा स्थितीत पचनासह शरीराची सर्व कार्ये व्यवस्थित चालतात. आपण दिवसभरात किमान ८ ते १० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. शिवाय असे पदार्थ खा ज्यात पाण्याचे प्रमाण जास्त असेल.

◼️ आलं : आहारात आल्याचा समावेश केल्याने अपचन आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. पदार्थात आल्याचा समावेश केल्याने पचनक्रिया मजबूत होते आणि शरीरातील आजारही दूर होतात. आपण कच्चे आले चघळू शकता किंवा आल्याचा चहा, आले पाणी, आले कँडी खाऊ शकता.

◼️ दही : आपण दही कोणत्याही ऋतूत खाऊ शकता. दही हे एक प्रोबायोटिक फूड आहे. दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिया मुबलक प्रमाणात आढळतात. ज्यामुळे पचनक्रियेत कोणतीही अडचण येत नाही. आहारात दह्याचा समावेश केल्याने पोट थंड राहते, शिवाय अन्नही लवकर पचते. आपण दही जेवण करताना किंवा जेवणानंतरही खाऊ शकता.

◼️ शतपावली : जेवल्यानंतर काहींना लगेच झोपण्याची सवय असते. पण ही सवय वेळीच टाळा. जेवल्यानंतर शतपावली करा, निदान १० ते १५ मिनिटं शतपावली करणं गरजेचं आहे. यामुळे अन्न पचण्यास मदत होते आणि नंतर बद्धकोष्ठता किंवा गॅसेससारखा त्रास होत नाही.
 


अपचन होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्याल? :