बातम्या

ज्येष्ठांचा आहार कसा असावा

What should be the diet of seniors


By nisha patil - 2/8/2024 11:28:35 AM
Share This News:



सांध्यांचे, मणक्यांचे विकार, तसंच त्वचेच्या कोरडेपणाचे विकार ज्येष्ठत्व काळात बळवतात. 

मांसपेशी अशक्त, कोरड्या होऊन त्वचेची प्रतिकार क्षमता कमी होते आणि इतरांपेक्षा थंडी, उन्हाळा अधिक जाणवू लागतो. यावर काळे तीळ, पांढरे तीळ भाजून खाणं, तीळ आणि सुक्या खोबऱ्याचे एकत्रित मिश्रण तूपावर भाजून सेवन करणं, वाटणामध्ये आवर्जून तीळ टाकावे

तीळ आणि गुळाचे लाडू, तीळ, आळीव, गुळाचा लहान लाडू हा सांध्यांना लाभदायक ठरतो

ज्येष्ठांच्या पोटातील वायू कमी करण्यास ओव्याचा मोठा उपयोग होतो. पोटाच्या विकारांवर ज्वारी, तूप लावलेली बाजरी, आलेमिश्रित भात, गरम भोजन, तसंच प्रकृती अवस्थेप्रमाणे तुपाचा वापर करावा. भोजनानंतर गरम पाणी हे वातकाळातील उत्तम औषध ठरतं.

पालेभाज्या कमी कराव्यात

डोळ्यांचे आजार होऊ नये या साठी शेवग्याची भाजी आहारात नियमित असावी.

साबण शाम्पू बंद करून फक्त शिकेकाई उटणे आणि तेलाचा वापर करावा

मणक्यांच्या विकारांची वाढ ज्येष्ठ वयात अधिक होते. यासाठी तीळ, खोबरे, जव, भाज्या या गुणकारी ठरतात.

आले रस,आले पाक आहारात असावा

सिझनल फळे, भाज्या आहारात असाव्या. रोज दूध घ्यावे

भात कमी करावा

आपल्या गोळ्या औषधे वेळेवर घ्यावीत. पाणी जास्त प्यावे

चालताना जवळ काठी ठेवावी

नियमित डोक्याला तेल लावावे आणि व्यायाम करावे आणि रोज चालण्यास जावे 

रोज शुद्ध सोन आणि चांदी मधात उगाळून घ्यावी. डायबेटिस असल्यास पाण्यात उकळून हे पाणी प्यावे
 


ज्येष्ठांचा आहार कसा असावा