बातम्या

हार्मोन्स संतुलित राखण्यासाठी काय खावे

What to eat to keep hormones balanced


By nisha patil - 5/6/2024 6:00:47 AM
Share This News:



हार्मोन्स शरीराला अनेक प्रकारे मदत करतात. ते आपल्या शरीरातील सर्व संतुलित क्रियांवर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करू शकतात. म्हणून हे हार्मोन्स संतुलित राखणे आणि शरीर सुस्थितीत ठेवणे अतिशय गरजेचे असते. हार्मोन्स संतुलित राखण्यासाठी सर्वात गरजेचे असते योग्य पदार्थांचे सेवन करणे, जर तुम्ही कोणतेही खाद्य पदार्थ कसेही कोणत्याही वेळेत खात असाल आणि एकंदरीत तुमचे तुमच्या आहारावर नियंत्रण नसेल तर हार्मोन्सची क्रिया बिघडून शरीराला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला काही अशा पदार्थांबद्दल सांगणार आहोत ज्यांचे सेवन केल्याने शरीरातील हार्मोन्सचे संतुलन योग्य राहते आणि तुम्ही कित्येक गंभीर समस्यांपासून स्वत:च्या शरीराचा बचाव करू शकता. चला तर जाणून घेऊया या खाद्य पदार्थांबद्दल आणि सोबत याची सुद्धा माहिती घेऊया की हार्मोन्सचे हे संतुलन शरीरासाठी किती गरजेचे आहे.

जेवढी आपल्या शरीराला पोषक तत्वांची गरज असते तेवढीच गरज असते शरीरातील हार्मोन्स संतुलित राखण्याची! याकडे दुर्लक्ष करणे आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते. हार्मोन्सच्या संतुलनामुळेच आपल्या शरीराचे कित्येक अवयव कोणत्याही समस्येशिवाय आपले कार्य अचूक पद्धतीने करत असतात. हार्मोन्स संतुलित ठेवायचे असतील तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पुरेशी झोप घेणे. हा हार्मोन्स संतुलित ठेवण्याचा सगळ्यात सोप्पा मार्ग आहे. या शिवाय आम्ही आधीच सांगितल्याप्रमाणे चांगले खाद्य पदार्थ खाऊन सुद्धा तुम्ही हार्मोन्स संतुलित ठेवू शकता. चला तर जाणून घेऊया त्या खाद्यपदार्थांबद्दल!

बीट म्हणजे जास्तीत जास्त सलाड मधून खाल्ले जाणार फळ. अनेक आरोग्य व फिटनेस तज्ञ उत्तम आरोग्यासाठी बीटाचे सेवन करण्यास सांगतात. कारण बीटामध्ये खूप जास्त पौष्टिक पदार्थ असतात जे आपल्या शरीराला सक्षम राखण्यात मदत करतात. बीट कच्चे खाल्ले किंवा त्याचा ज्यूस करून प्यायल्यास शरीराला सर्वाधिक फायदा होतो तो हार्मोन्स संतुलित राखण्यासाठी. त्यामुळे तुम्ही अजूनही बीट चांगलं लागत नाही म्हणून ते खाण्यास टाळाटाळ करत असाल तर कृपया त्याचे सेवन करणे सुरु करा. ते तुमच्या भल्याचेच ठरेल.
 


हार्मोन्स संतुलित राखण्यासाठी काय खावे