बातम्या

पावसाळ्यात कोणत्या डाळी खाणं सगळ्यात चांगलं? वाचाल तर पोट होणार नाही खराब.....!

Which pulses are best to eat during monsoon


By nisha patil - 7/13/2024 7:23:50 AM
Share This News:



बरेच लोक रोजच्या जेवणात डाळीचं वेगवेगळ्या पद्धतीने सेवन करतात. तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, उडीद डाळ इत्यादी डाळीचं लोक सेवन करतात. डाळींमधून शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात. त्यामुळे डाळींचं सेवन करण्याचा सल्ला डॉक्टरही देतात. पण पावसाळ्यात कोणत्या डाळीचं सेवन करावं आणि कोणत्या डाळींचं करू नये? असा प्रश्न अनेकांना पडतो. कारण पावसाळ्यात आरोग्यासंबंधी अनेक समस्या होत असतात. त्यामुळे वातावरणानुसार काही गोष्टींचं सेवन करावं लागतं. अशात आज आम्ही तुम्हाला हे सांगणार आहोत की, पावसाळ्यात कोणत्या डाळीचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.

कोणत्या डाळी जास्त खाव्या...?
पावसाळ्यात मूग आणि मसूरची डाळ खाण्याचा सल्ला दिला जातो. तशा या डाळी तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये खाऊ शकता. मात्र, या डाळींचं महत्व वाढतं. जर तुम्ही मूग आणि मसूर डाळ मिक्स करूनही खाल तर तुम्हाला अनेक फायदे मिळतील. मूग डाळ आणि मसूरची डाळ आपल्या पोटासाठी पचन तंत्रासाठी फार फायदेशीर आहेत.

मिक्स डाळ फायदेशीर...
मूग आणि मसूरची मिक्स डाळ तुम्हाला कोणत्याही सीझनमध्ये फायदेशीर ठरते. खासकरून पावसाळ्यात या मिक्स डाळी खाल्ल्याने जास्त फायदे होतात. पावसाळ्यात आपलं पचनतंत्र खूप कमजोर झालेलं असतं. लवकर काही पचन होत नाही. अशात मूग आणि मसूर डाळ खूप लवकर पचतात. मूग डाळ ही थंड असते आणि मसूरची डाळ ही उष्ण असते. त्यामुळे या डाळी मिक्स करून खाल तर याने पोटाला फायदा होतो.

प्रोटीनचा खजिना आहे दोन्ही डाळी...
तशा तर सगळ्याच डाळींमध्ये प्रोटीन भरपूर असतं. आरोग्यासाठी प्रोटीन खूप गरजेचंही असतं. त्याशिवाय प्रोटीन आपले केस, नखे आणि शरीरात नवीन कोशिका तयार करण्याचं काम करतं. त्यामुळेच रोज जेवणात एक वाटी डाळ खाण्याचा सल्ला दिला जातो. रोज जरी शक्य नसलं तरी आठवड्यातून 3 ते 4 वेळा मसूर आणि मूगाची मिक्स डाळ खाल्ली पाहिजे. घरातील लहान मुले आणि वयोवृद्धांसाठी मूग आणि मसूरची डाळ खूप फायदेशीर आहे.

काय काय होतात फायदे...?
जे लोक आठवड्यातून 4 ते 5 वेळा मूग आणि मसूरची मिक्स डाळ खातात तेव्हा त्यांना अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते. या डाळी मिक्स खाल्ल्याने शरीरातील वाढलेलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं. डायबिटीसचा धोका कमी होतो. या डाळींमध्ये लो फॅट असतं ज्यामुळे हृदयरोगांपासूनही बचाव होतो. त्यासोबतच या डाळींमध्ये फायबर भरपूर असतं. ज्यामुळे पोटाच्या समस्या दूर होतात. या डाळीमध्ये आयर्न आणि झिंक भरपूर असतं जे शरीरात रक्त वाढवण्यास मदत करतात. 

पचनासाठी हलक्या डाळी...
हाय प्रोटीन असल्याने डाळी पचन होण्यास जड असतात. त्यामुळेच डाळी सामान्यपणे दिवसा खाण्याचा सल्ला दिला जातो. पोटाची कोणतीही समस्या झाल्यावरही मूग आणि मसूरची डाळ वेगवेगळ्या पद्धतीने खाण्याचा सल्ला दिला जातो. पचन तंत्र बिघडलं असेल, उलटी, जुलाब, पोटदुखी, बद्धकोष्ठता, गॅस, पोट फुगणे यांसारख्या झाल्यावर या डाळी खाण्यास सांगितलं जातं. कारण या डाळी लवकर पचतात. या डाळी पातळ खाल्ल्या तर अधिक फायदा होतो. 

कोणत्या डाळी खाऊ नये...?
पावसाळ्यात कोणत्या डाळी खाऊ नये असाही प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर पावसाळ्यात उडीद डाळ अजिबात खाऊ नये. कारण ही डाळ पचण्यास खूप वेळ लागतो. त्यामुळे पोटासंबंधी समस्या होऊ शकतात. तसेच या दिवसात चणा डाळ सुद्धा खाणं टाळलं पाहिजे. तूर डाळीचं सेवन कमी करावं.


पावसाळ्यात कोणत्या डाळी खाणं सगळ्यात चांगलं? वाचाल तर पोट होणार नाही खराब.....!