बातम्या
पायात गोळे का येतात?
By nisha patil - 5/28/2024 6:13:37 AM
Share This News:
अतिश्रमामुळे पायाच्या स्नायूंवर ताण येणे
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे
आहारात मिठाचे सेवन अधिक असणे
रक्तातील सोडियम/ पोटॅशियमचे प्रमाण कमी- जास्त होणे.
डायलिसिसवर असणाऱ्या व्यक्तींच्या पायावर ताण येतो.
गर्भारपणात विशेषत: सातव्या महिन्यात
थायरॉइड ग्रंथींचे कार्य शिथिल झाल्यास हायपोथॉ- रॉडिझमचा त्रास उद्भवतो.
पायातील शुद्ध रक्तवाहिन्या आंकुचन पावल्यामुळे होणाऱ्या आजारात पायात पेटके/गोळे येतात.
अति मद्यपान.
पथ्ये
सतत एका ठिकाणी खूप वेळ पाय मोकळे सोडून बसू नका.
खुर्चीत बसताना पावले जमिनीवर ठेवा.
शरीरातील रक्त तपासून क्षारांची पातळी योग्य/ अयोग्य प्रमाणात आहे का? याची माहिती घ्या
अतिरिक्त पायांची हालचाल व शरीराची शुष्कता या गोष्टी उष्ण हवामानात वारंवार आढळतात,तसेच काही औषधांचे अतिरिक्त सेवन व शारीरिक आजार हे सर्व घटक पायात गोळे येण्यास कारणी भूत ठरतात.
वजन आटोक्यात ठेवा.
जीवनशैली बदला व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हलका व योग्य प्रमाणात व्यायाम करा.
अतिथंड हवामान व अति उष्ण हवामानात जास्त काळजी घ्या.
कोणता बदल झाल्यानंतर पायात गोळे येतात याची नोंद ठेवा.
पायात गोळे का येतात?
|