बातम्या
व्यायाम का करावा...?
By nisha patil - 10/15/2024 5:53:09 AM
Share This News:
आपण नेहमीच व्यायाम टाळण्यासाठी अनेक कारणे शोधत असतो...
एक तारखेपासून करतो चालू, सोमवारी सुरुवात करतो, हा आठवडा होऊदे मग करतो व्यायाम... तर असा हा व्यायाम...
फक्त वजन कमी करण्यासाठीच नाही तर आणखीही बऱ्याच गोष्टी साठी फायदेशीर आहे... याविषयी सविस्तर पाहुयात...
▫️व्यायामामुळे स्नायु बळकट होतात. काम करण्याचा वेग वाढतो आणि थकवा जाणवत नाही...
▫️वेट ट्रेनिंग सारखा व्यायाम केला तर हाडांना कॕल्शियम पोहचू शकते...
▫️व्यायामाने शरीराची लवचिकता वाढते व त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात होतो...
▫️व्यायामाच्या सवयी मुळे चांगले हाॕर्मोन्स स्रवतात. त्यामुळे आनंदी वाटते आणि ताणही कमी होतो...
▫️झोप चांगली लागते, त्यामुळे मानसिक ताण कमी होतो. भूक लागणारे हाॕर्मोन जसे कि, लेप्टीन आणि घर्लिन यांचे काम नीट सुरु राहुन भुकेवर नियंत्रण राहते...
▫️व्यायामामुळे आत्मविश्वास वाढीस लागतो. स्व:त बद्दल प्रेम वाटते आणि उत्तम आहाराबद्दल आस्थाही आपोआप वाढते...
▫️घामावाटे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडून रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुरळीत राहते. रक्ताभिसरण वाढून त्वचा छान राहते...
▫️सगळ्यात महत्वाचे प्रतिकारशक्ती वाढते...
▫️व्यायामाच्या रोजच्या सवयीमुळे आपल्याला कॕल्शियम, आयर्न, प्रोटीन यांची मात्रा किती असायला हवी ते कळते त्या नुसार आहार कमी जास्त करता येतो...
▫️ महत्वाचे:- चटपटीत पदार्थ खाण्याच्या सवयीमूळे खरी भूक लोक विसरुन गेलेत. उमेदीच्या काळात जर व्यायाम न करण्याकडे कल असेल तर हाच व्यायाम नंतर फीजीओथेरपी म्हणून करण्याची वेळ येते. त्यात वेळ आणि पैसे दोन्ही लागते आणि टेंन्शन येते ते वेगळेच...
त्यामुळे मला व्यायामाला वेळ कसा मिळत नाही हे कारण शरीर कधीच पटवून घेत नाही. म्हणून रोज किमान ३०-४५ मिनीट आवडीचा व्यायाम करा म्हणजे हळूहळू इतर व्यायाम पध्दतींची गोडी लागेल.
व्यायाम का करावा...?
|