बातम्या
रद्द केलेला शक्तिपीठ पुन्हा नव्याने कशासाठी...?
By nisha patil - 3/13/2025 4:38:30 PM
Share This News:
रद्द केलेला शक्तिपीठ पुन्हा नव्याने कशासाठी...?
आमदार सतेज पाटील यांचा सरकारला सवाल
नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गावरून शेतकऱ्यांचा आझाद मैदानावर धडक मोर्चा
मुंबईतील आझाद मैदानावर नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांचा तीव्र मोर्चा सुरू आहे. यापूर्वी निवडणुकीच्या आधी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रकल्प रद्द केला होता, मात्र आता तो पुन्हा का सुरू करण्यात येत आहे, असा सवाल उपस्थित झाला आहे.
आज विधानसभेत आमदार सतेज पाटील यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारच्या भूमिकेवर सवाल करताना हा प्रकल्प शेतकऱ्यांवर जबरदस्तीने का लादला जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांना चिरडण्याचा हा प्रयत्न का? या महामार्गामुळे शेतकरी, पर्यावरण आणि गावांचे मोठे नुकसान होणार असल्याने आंदोलन अधिक तीव्र होणार असल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
रद्द केलेला शक्तिपीठ पुन्हा नव्याने कशासाठी...?
|