बातम्या

होमिओपॅथी ची ट्रीटमेंट का घ्यावी?

Why take homeopathy treatment


By nisha patil - 5/15/2024 9:10:23 AM
Share This News:



पूर्ण उपचार - होमिओपॅथी मध्ये फक्त लक्षणांवर नाही तर शारीरिक मानसिक आणि भावनात्मक स्तरावर जाऊन व्यक्तीवर उपचार केले जातात त्यामुळे आजार पूर्णपणे बरा होण्यास मदत होते.
नैसर्गिकरीत्या उपचार - निसर्गातीलच विविध घटकांचा वापर करून होमिओपॅथीची औषधे बनवलेली असतात. त्यामुळे ती अतिशय सौम्य असतात.आणि शरीराला अपाय करणारी नसतात.
व्यक्तिगत ट्रीटमेंट - जशी हाताची बोटे एकसारखी नसतात तसेच प्रत्येक व्यक्ती हा एक सारखा नसतो. म्हणूनच होमिओपॅथी मध्ये प्रत्येक व्यक्तीची पूर्ण विचारपूस करून व संपूर्ण माहिती घेऊनच त्या व्यक्तीला उपचार दिले जातात. म्हणूनच औषध लवकर लागू होते व त्रासातून कायमची मुक्तता होते.
साईड इफेक्ट शिवाय उपचार - होमिओपॅथीची औषधे ही निसर्गातील घटकापासून बनवलेले असल्यामुळे त्याचे आपल्या शरीरावर कुठलेही साईड इफेक्ट होत नाहीत. व आपली नैसर्गिकरित्या रोगापासून मुक्तता होते.
 रोगप्रतिकारक शक्ती वाढते - होमिओपॅथीच्या उपचारांनी आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढते व आपल्याला ज्ञात असलेले नसलेले सर्व रोग नाहीसे होतात व आपण सहसा जास्त आजारी पडत नाही, हा होमिओपॅथिक उपचार पद्धती मधील खूप मोठा फायदा आहे.
विविध कारणांसाठी उपचार - होमिओपॅथी उपचार पद्धतीने सर्व प्रकारचे आजार जसे की जुनाट आजार, अचानक उद्भवलेले आजार, मानसिक आजार, भीतीमुळे होणारे आजार, लहान मुलांमधील आजार या सर्वांवर अतिशय प्रभावी औषधे आहेत. होमिओपॅथिक औषधे व्यक्तीला शारीरिक मानसिक आणि भावनात्मक स्तरावर स्टेबल करून जीवनाचे स्वातंत्र्य मिळवून देते
🔸 खर्च कमी - इतर उपचार पद्धतींच्या तुलनेत होमिओपॅथीक उपचार हा कमी खर्चामध्ये होतो. यामध्ये आपल्याला खूप जास्त तपासण्या करण्याची गरज भासत नाही किंवा अनेक वेळा ऑपरेशन करण्याची सुद्धा गरज पडत नाही. म्हणूनच आपला खूप मोठ्या प्रमाणात खर्च वाचतो.
 व्यक्तिगत उपचार - प्रत्येक व्यक्तीला उपचारासाठी वैयक्तिक वेळ देऊन त्या व्यक्तीची पूर्ण माहिती विचारून घेतले जाते, व्यक्तीचा आजार, व्यक्तीची शारीरिक स्थिती, मानसिक स्थिती, सर्व प्रकारची लक्षणे अशाच अनेक गोष्टी विचारून मग त्यावर उपचार केले जातात. त्यामुळे खात्रीशीरपणे रिझल्ट येतोच.

 


होमिओपॅथी ची ट्रीटमेंट का घ्यावी?