बातम्या
दीड कोटी सभासद नोंदणी पूर्ण करून विजय मिळवा – चंद्रशेखर बावनकुळे
By nisha patil - 2/16/2025 10:48:40 PM
Share This News:
दीड कोटी सभासद नोंदणी पूर्ण करून विजय मिळवा – चंद्रशेखर बावनकुळे
कोल्हापूर, दि. 16: भाजपाच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी दीड कोटी सभासद नोंदणीचा टप्पा पूर्ण करावा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
भाजपाच्या संघटन पर्व कार्यशाळेत त्यांनी पक्षबांधणीसाठी सभासद नोंदणी आणि बूथ रचना नियोजनावर भर दिला. त्यांनी "लाडकी बहिण" योजनेत 1500 रुपयांवरून 2100 रुपये वाढवण्याची घोषणा केली.
यावेळी चंद्रकांत पाटील, रवींद्र चव्हाण, जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले आदी मान्यवरांसह कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दीड कोटी सभासद नोंदणी पूर्ण करून विजय मिळवा – चंद्रशेखर बावनकुळे
|