बातम्या

महिलांनी ऑफिसमध्ये अ‍ॅक्टिव्ह, आनंदी राहण्यासाठी करावे ‘हे’ उपाय

Woman office active


By nisha patil - 7/30/2024 7:21:54 AM
Share This News:



नोकरी करत असलेल्या महिलांना दररोज तारेवरची कसरत करावी लागते. त्यांना घर आणि ऑफिसातील काम अशा दोन मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. मानसिक ताण, कामाच्या ठिकाणचे राजकारण, हे सर्व करताना त्या थकून जातात. त्यांना या परिस्थितीला तोंड देण्यासाठी शारीरिक व मानसिक ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा मिळवण्यासाठी काही खास उपाय महिलांनी केले पाहिजेत.


हे आवश्य करा
१ ऑफिसमध्ये असताना थोडावेळ काम बाजूला ठेवून प्रत्येक सहकाऱ्याजवळ जाऊन त्याच्याशी बोला. यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल आणि संबंधही चांगले राहतील.

२ ऑफिसच्या पॉलिटिक्सकडे दुर्लक्ष करा. कारण यातून केवळ मनस्ताप मिळतो. सर्वच सहकाऱ्यांशी विश्वासाचे नाते ठेवा.


३ ऑफिसात सर्वांशी मित्रत्वाचे संबंध ठेवा. घरच्या गोष्टीचा ऑफिस कामावर व ऑफिसातील गोष्टीचा घरातील वातावरणावर परिणाम होऊ देऊ नका.

४ मनाला प्रसन्नता देणारी एखादी वस्तू डेस्कवर ठेवा. पंधरा दिवसातून एकदा या वस्तू बदलत रहा.

६ कार्यालयातील सहकाऱ्यांच्या सुख-दुखात सहभागी व्हा.


महिलांनी ऑफिसमध्ये अ‍ॅक्टिव्ह, आनंदी राहण्यासाठी करावे ‘हे’ उपाय