बातम्या
महिलांनी रोज रिकाम्या पोटी 'हे' फळ खावे;
By nisha patil - 5/18/2024 6:02:07 AM
Share This News:
खजूर एक असे फळ आहे ज्याचे सेवन केल्याने शरीराला ताकद आणि ऊर्जा मिळण्यास मदत होते. हृदय निरोगी राहण्यासाठी दररोज खजूर खाणे खूप महत्वाचे असते.
खजुरात भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जे खाल्ल्याने हिवाळ्यात शरिराला आराम मिळण्यास मदत होते. रिसर्चमध्ये हे सिद्ध झाले आहे की, महिलांनी रोज 5 खजूर खावेत. विशेषत: ज्या महिलांना मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना होतात त्यांनी रोज खजूर खायला हवे.
वाळलेल्या खजूरमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आणि फायबरचे घटक असतात. याव्यतिरिक्त, त्यात अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. जे हृदय आणि फुफ्फुसाच्या आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करता. जाणून घ्या खजूर खाण्याचे फायदे काय आहेत आणि ते कसे खावे.
दररोज किती खजूर खायला हवेत : सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. खजूर खाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे प्रथम त्यांना रात्रभर पाण्यात भिजवून ठेवणे. भिजवलेले खजूर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी सहज खाऊ शकता. सुरुवातीला 2-3 खजूर खाव्यात आणि नंतर त्याचे प्रमाण वाढवता येऊ शकते.
खजूरमध्ये अनेक पोषक घटक आढळतात : खजुरात पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. यामध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोह, मँगनीज, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी 6 आणि सोडियम मुबलक प्रमाणात आढळतात.
खजूर खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. हे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्याचे काम करते. हे खाल्ल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते.
खजूरमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात, जे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करण्यास मदत करतात. तसेच यामुळे हृदयाशी संबंधित अनेक आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते.
खजूर खाल्ल्याने डोळे आणि पोटाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. तसेच फ्लेव्होनॉइड्स नावाचे अँटीऑक्सिडंट मधुमेह, अल्झायमर आणि अनेक प्रकारच्या कर्करोगापासून आराम मिळण्यास मदत होते.
खजूर खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. यामध्ये व्हिटॅमिन क असते ज्यामुळे रक्ताची पातळी सुधारण्यास मदत होते.
या मुले महिलांनी दररोज सकाळी खजुराचे सेवन करायला हवे. तुम्ही खजुराचे सेवन केल्यास तुम्हला या यासारखे अनेक फायदे मिळण्यास मदत होईल.
महिलांनी रोज रिकाम्या पोटी 'हे' फळ खावे;
|