बातम्या

शिरढोण येथे कृष्णा योजनेच्या नवीन पाईपलाईन बदलाच्या कामाला गती

Work on new pipeline replacement of Krishna project at Shirdhon accelerates


By nisha patil - 3/20/2025 12:13:25 PM
Share This News:



शिरढोण येथे कृष्णा योजनेच्या नवीन पाईपलाईन बदलाच्या कामाला गती

आ. डॉ. राहुल आवाडे यांनी पाहणी दौऱ्यात अधिकाऱ्यांना दिल्या आवश्यक सूचना

इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा योजनेतील नवीन पाईपलाईन बदलाचे काम सध्या शिरढोण येथे वेगाने सुरू आहे. या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आणि काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

या बदलामुळे इचलकरंजी शहरातील नागरिकांना अधिक नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा मिळणार आहे. पाहणी दौऱ्यात अरुण ऐनापुरे, विजय पाटील, मौला बागवान, अविनाश कोळी, अवधूत पोवार, राहुल बिरजे, नितेश शिरूटे, अभी खिलारी, बंडु जाधव, वाशिम शेख यांसह अनेक स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.


शिरढोण येथे कृष्णा योजनेच्या नवीन पाईपलाईन बदलाच्या कामाला गती
Total Views: 22