बातम्या
इचलकरंजी पाणीपुरवठा सुधारण्यासाठी नवीन सहा टाक्यांचे काम लवकरच सुरू
By nisha patil - 3/31/2025 2:58:01 PM
Share This News:
इचलकरंजी पाणीपुरवठा सुधारण्यासाठी नवीन सहा टाक्यांचे काम लवकरच सुरू
कृष्णा पाईपलाईन बदलाचे काम अंतिम टप्प्यात – राहुल आवाडे
नागरिकांना वेळेवर आणि मुबलक पाणीपुरवठ्यासाठी नियोजन सुरू
भारतीय जनता पार्टी कार्यालय, इचलकरंजी येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. ज्यामध्ये इचलकरंजीच्या पाणीपुरवठ्याशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना राहुल आवाडे म्हणाले की, 'इचलकरंजी शहराची कृष्णा पाईपलाईन बदलाचे काम सुरू आहे आणि ते लवकरच पूर्ण होईल. यासोबतच, नवीन सहा टाक्यांच्या मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्या टाक्यांचे कामही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल.
यामुळे इचलकरंजीला वेळेवर आणि अधिक प्रमाणात पाणी पुरवठा होईल, हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही योग्य नियोजन करत आहोत.' पाण्याच्या व्यवस्थेतील सुधारणा आणि नागरिकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर, शहराध्यक्ष अमृत भोसले, प्रकाश दतवाडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
इचलकरंजी पाणीपुरवठा सुधारण्यासाठी नवीन सहा टाक्यांचे काम लवकरच सुरू
|