विशेष बातम्या
तुरंबे येथे जंगी निकाली कुस्त्यांचे मल्लयुद्ध;
By nisha patil - 3/26/2025 8:56:50 PM
Share This News:
तुरंबे येथे जंगी निकाली कुस्त्यांचे मल्लयुद्ध;
देशभरातील नामवंत पैलवान आखाड्यात उतरणार
तुरंबे, ता. राधानगरी: ग्रामदैवत श्री महालक्ष्मी व श्री गहिनीनाथ गैबी पीर यात्रेनिमित्त कोल्हापूर जिल्हा व शहर कुस्तीगीर असोसिएशनच्या मान्यतेने जंगी निकाली कुस्त्यांचे मल्लयुद्ध आयोजित करण्यात आले आहे. १ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ३ वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र, तुरंबे येथे हा थरारक कुस्ती महोत्सव पार पडणार आहे.
या कुस्ती महोत्सवात देशभरातील नामांकित पैलवान आपली ताकद आणि कुस्ती तंत्र दाखवणार आहेत. स्पर्धेचे आखाडा पूजन व प्रतिमा पूजन ग्रामपंचायत तुरंबे, यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने पार पडणार आहे.
स्मरणार्थ शिल्ड वाटप:
कै. सम्राट विलास तहसिलदार स्मरणार्थ – श्री. मयूर शिवाजी तहसिलदार यांच्याकडून (शिल्ड क्र. १ ते १०)
कै. सौ. संगीता सर्जेराव भोईटे स्मरणार्थ – (शिल्ड क्र. ११ ते ५०)
प्रमुख कुस्त्या:
पै. बिराज सातारकर (पेरिड) VS पं. कर्तार कंबल (काळ)
पै. प्रतिक म्हेतर (राशिवडे) VS पै. स्वप्निल शेंडे (शिवशंभो तिटवे)
पै. ओंकार पाटील (द्रोणागिरी) VS राजेश भंडारी (आजोबा)
यावेळी श्री. सर्जेराव ज्ञानदेव भोईटे यांच्या वतीने विशेष कुस्ती सामना देखील रंगणार आहे.
मनसे तालुकाप्रमुख राहुल कुंभार यांच्या वतीने २ नंबरचे बक्षीस जाहीर
या कुस्ती महोत्सवात मनसेचे राधानगरी तालुकाप्रमुख मा. राहुल दादा कुंभार यांच्या वतीने २ नंबरचे बक्षीस देण्यात आले आहे. या माध्यमातून त्यांनी कुस्तीप्रेमींसाठी आपले योगदान दिले आहे.
कुस्ती रसिकांसाठी हा सोहळा एक हे पर्वणी ठरणार असून, आखाड्यात पैलवानांची ताकद आणि तंत्र पाहण्यासाठी कुस्ती प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यात्रा कुस्ती कमिटी अध्यक्ष वैभव माने यांनी केले आहे.
तुरंबे येथे जंगी निकाली कुस्त्यांचे मल्लयुद्ध;
|