बातम्या

तुम्ही देखील कॅन्सरवाला चहा तर पित नाही ना?

You dont drink tea for cancer do you


By nisha patil - 7/18/2024 7:36:44 AM
Share This News:



चहा हा अनेकांच्या आवडीचा विषय आहे. त्यामुळे चहा पिण्यासाठी ते कधीही उत्सूक असतात. पावसाळ्यात तर चहा पिण्याची मजाच वेगळी असते. पण तुम्हाला माहित आहे की, या चहामुळे कॅन्सर देखील होऊ शकतो. कसे ते जाणून घ्या.
चहाचा वेळ झाली की तो कधी समोर येतो असं होतं. चहा प्यायला अनेकांना आवडतं. चहा आवडत नाही असं म्हणणारे क्वचितच लोकं भेटतात. काहींना चहा न पिल्याने डोकेदुखी दूर होते. पावसाळ्यात तर चहाची मागणी आणखी वाढतेय. पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीवर चहा पिण्याची मजाच वेगळी असते. चहाच्या टपरीवर तुम्ही देखील चहा पित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण तुम्हाला माहीत आहे का की, चहामुळे देखील कॅन्सर होऊ शकतो? होय, आता तुमचा लाडका चहावाला देखील भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या तपासणीत आला आहे. कोबीचे मंचुरियन, पाणीपुरी, कॉटन कँडी आणि कबाब सारख्या खाद्यपदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या फूड कलरवर बंदी आणल्यानंतर आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे.चहाच्या पानांवर किटकनाशके
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना चहाच्या पानांमध्ये प्रक्रियेदरम्यान कीटकनाशके आणि रंगांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचं आढळून आले आहे. जे लोक खाद्यपदार्थ बनवतात आणि विकतात ते रोडामाइन-बी आणि कार्मिसिन सारख्या खाद्य रंगांचा वापर करतात. हे रंग अत्यंत विषारी मानले जातात. चहाच्या पानांवर कीटकनाशके वापरले जातात. ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो. कर्नाटकचे आरोग्य मंत्रालय लवकरच अशा चहाच्या बागांवर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे जे चहा पिकवताना जास्त प्रमाणात कीटकनाशकांचा वापर करतात.

आरोग्यासाठी घातक चहा
कर्नाटक आरोग्य मंत्रालयाने विविध जिल्ह्यांमधून नमुने गोळा केले आहेत. जिथे चहाचा वापर खूप जास्त आहे. बागलकोट, बिदर, गदग, धारवाड, हुबळी, विजयनगर, कोप्पल आणि बल्लारी या जिल्ह्यांत चहामध्ये कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे आढळून आले आहे. जे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात.कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी सांगितले की, ते सर्व काही बारकाईने पाहत असून भेसळीबाबत लोकांना माहिती दिली जात आहे. कबाब किंवा गोबी मंचुरियनवर बंदी घालत नाही, तर त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या हानिकारक पदार्थांवर आम्ही बंदी घालत आहोत. हेच चहापत्तीला ही लागू होते.


तुम्ही देखील कॅन्सरवाला चहा तर पित नाही ना?