बातम्या

गरम पाणी तुम्ही सकाळीच प्यायला पाहिजे असे नाही.

You dont have to drink hot water in the morning


By nisha patil - 10/9/2024 7:40:00 AM
Share This News:



 तर तुम्ही रात्रीही गरम पाणी पिऊ शकता. उलट रात्री झोपण्याआधी हे पाणी प्यायल्याने आपले शरीर डिटॉक्स अर्थात विषारी पदार्थांपासून दूर ठेवते. तसेच आपली प्रतिकारशक्ती मजबूत करते आणि संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण होते. महत्वाचे म्हणजे, रात्री गरम पाणी प्यायल्यानेही झोप चांगली लागते. रात्री गरम पाणी प्यायल्याने आणखी काय फायदे होतात, ते जाणून घेणे महत्वाचे आहे.वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

वजन कमी करण्यासाठी काही लोकं सकाळी गरम पाणी पिण्याचा नियम करतात. पण रात्री गरम पाणी प्यायल्यानेही वजन कमी करण्यास मदत मिळते. गरम पाणी शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. त्यामुळे गरम पाणी लठ्ठपणा तसेच कॉलेस्टरॉलची समस्या असलेल्या लोकांसाठी खूप फायद्याचे ठरू शकतेचांगली झोप आणि मानसिक आरोग्यासाठी फायदा

गरम पाणी प्यायल्यामुळे मानसिक उदासीनता कमी होते. डिप्रेशनची समस्या असेल तर खूप आराम मिळतो. रात्री झोपण्याआधी गरम पाणी प्यायल्यास झोपेची गुणवत्ता वाढून चांगली झोप लागते. म्हणूनच जर तुम्हाला तणाव जाणवत असेल किंवा झोपेबाबत अडचणी असतील तर गरम पाणी पिणे गरजेचे आहे. त्यामुळे नक्कीच फायदा होईल.
[
पचनक्रिया सुधारते

गरम पाणी प्यायल्याने अपचनाची तक्रार दूर होऊन पचनक्रिया सुधारते. गरम पाण्यामुळे अन्न पचण्यासाठी पोटात बाहेर पडणाऱ्या पाचक रसांचा स्राव वाढतो. पचनक्रिया बरोबर असेल तर गॅस किंवा अॅसिडिटीही होत नाही. याशिवाय गरम पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. त्यामुळे पोटासंबंधी किंवा पचनसंस्थेशी संबंधित काही समस्या असल्यास गरम पाण्याचा वापर खूप प्रभावी ठरू शकतो.


गरम पाणी तुम्ही सकाळीच प्यायला पाहिजे असे नाही.