बातम्या

युरिक ऍसिड मध्ये फळांचे महत्व

Yourik asid


By nisha patil - 1/8/2024 12:40:54 AM
Share This News:



कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेप्रमाणेच, यूरिक एसिड देखील रक्तामध्ये आढळणारा  हानिकारक पदार्थ आहे, ज्यामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. आजकाल अनेकांना सांधेदुखीसारख्या आजारांनी ग्रासले आहे. रक्तातील यूरिक एसिडचे प्रमाण वाढणे हे या आजारांचे प्रमुख कारण असू शकते. ज्यांना युरिक ऍसिडचे प्रमाण जास्त असल्याने उद्भवणारे त्रास असतात, अशा लोकांनी सिट्रसयुक्त फळांचे सेवन करणे फायद्याचे ठरू शकते. यात विशेषतः संत्रे, आवळा, लिंबू अशी फळं समाविष्ट असतात.चेरी या फळापासून यूरिक अ‍ॅसिड करा नियंत्रित

चेरीचं सेवन केल्यानं यूरिक अ‍ॅसिड नियंत्रणात राहते. शरीरातील यूरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी चेरीमध्ये असलेलं अँथोसायनिन्स नावाचे नैसर्गिक दाहक-विरोधी गुणधर्म खूप प्रभावी ठरते. चेरी खाल्ल्यास शरीराताली सूज आणि जडपणाची समस्या दूर होते. तसंच चेरी खाल्ल्यानं गाऊट अटॅकचा धोका कमी होतो आणि याशिवाय क्रिस्टल्सच्या स्वरुपात सांध्यांमध्ये यूरिक अ‍ॅसिड जमा होत नाही.  

सफरचंद  यूरिक अ‍ॅसिडवर करते नियंत्रण

रोज सफरचंद खाल्ल्यानं यूरिक अ‍ॅसिडची पातळी नियंत्रणात राहते. रोजच्या आहारात किमान 2 सफरचंदांचा समावेश करावा. यामुळे यूरिक अ‍ॅसिडवर नियंत्रण राहिल याशिवाय त्याची लक्षणेही दूर होतील.

या फळांचं करा सेवन

स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रास्पबेरीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. या गुणधर्मामुळे यूरिक अ‍ॅसिडची पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रभावी राहते. या सर्व बेरी यूरिक अ‍ॅसिडला क्रिस्टल्सच्या स्वरूपात सांध्यामध्ये जमा होण्यापासून रोखतात. बेरीमध्ये असलेले फायबर रक्तातील यूरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी खूप प्रभावी ठरते.


युरिक ऍसिड मध्ये फळांचे महत्व