बातम्या

दीर्घायुष्य लाभण्यासाठी करा आवळ्याचे सेवन

amla for long life


By nisha patil - 7/18/2024 7:39:24 AM
Share This News:



आवळ्याचा आहार आणि औषधी द्रव्य म्हणून उपयोग करता येतो. आवळ्यामुळे आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभते. वार्धक्य अवस्था टाळून चिरतरुण राहण्यासाठी मदत करतो. आवळ्याच्या सेवनानं शरीर शुद्ध होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
डोकं शांत राहणं किंवा केसांच्या सर्व तक्रारींसाठी आवळ्याचं तेल इतर औषधींसह नियमित वापरल्यास फरक पडतो. ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी सकाळी मोरावळा खाल्ल्यास फायदेशीर ठरेल. लघवी साफ न होणे, आम्लपित्त, चक्कर येणे, पोट साफ न होणे अशा अनेक तक्रारींवर आवळा अत्यंत गुणकारी आहे. आवळ्यात क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्वचा रोगावर आवळा उत्तम औषध आहे. आवळ्याच्या नियमित सेवनाने शरीरातील रक्ताभिसरण क्रिया सुरळीत चालू राहते. नियमित आवळा सेवनाने स्मरणशक्ती आणि बुद्धी वाढते. आवळ्याचा रस खडीसाखरेबरोबर दिला असता डोकेदुखी, पोट, छाती व गळ्यातील आग, चक्कर तसेच अम्लपित्तामुळे होणारी उलटी व इतर लक्षणे कमी होतात.

नियमित आवळा सेवनाने स्मरणशक्ती व बुद्धी वाढते. आवळ्यापासून तयार केलेला च्यवनप्राश आहारात नियमितपणे घेतला पाहिजे. आवळा थोडासा पिकलेला असावा. कच्चे आवळे खाऊ नयेत. सर्दी खोकला यासांरखे त्रास अधिक वाढतात. शिवाय आवळे फ्रिजमध्ये देखील ठेऊ नका. आवळ्याचे पांढरे आवळे आणि रान आवळे असे दोन प्रमुख प्रकार आहेत. आयुर्वेदामध्ये आवळ्याला अत्यंत श्रेष्ठ मानलं आहे. आवळा पोषणाचं काम करतो. म्हणून आयुर्वेदात त्याला धात्री असंही म्हणतात.


दीर्घायुष्य लाभण्यासाठी करा आवळ्याचे सेवन