बातम्या

जेवण केल्यानंतर तुम्हाला स्नॅक्स खाण्याची सवय आहे का?

ave a habit of eating snacks after meals


By nisha patil - 3/8/2024 8:21:08 AM
Share This News:



 

पौष्टिक आहार हा निरोगी जीवनासाठी आवश्यक आहे; पण त्याचबरोबर चांगल्या आहाराच्या सवयीसुद्धा महत्त्वाच्या आहेत. अनेक जण जेवण केल्यानंतर स्नॅक्स खातात. खरेच जेवण केल्यानंतर स्नॅक्स खाणे कितपत चांगले आहे? द इंडियन एक्स्प्रेसने हैदराबाद येथील केअर हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ जी. सुषमा यांच्या हवाल्याने सविस्तर माहिती दिली आहे.

जी. सुषमा सांगतात, “अनेक लोक वेगवेगळ्या कारणांमुळे स्नॅक्स खातात. कधी ऊर्जा वाढविण्यासाठी खातात; तर कधी त्यांना हार्मोनल बदलांमुळे स्नॅक्स खाण्याची इच्छा निर्माण होते. काही जण रक्तातील साखरेची पातळी कमी झाली म्हणून स्नॅक्स खातात. आश्चर्याची बाब म्हणजे काही लोक वजन कमी करण्यासाठी आणि आहार सुधारण्यासाठीही स्नॅक्स खातात.”

स्नॅक्स खाणे चांगले की वाईट...?
एखाद्या वेळेस स्नॅक्स खाणे वाईट नाही; पण तुम्ही सातत्याने स्नॅक्स खात असाल, तर आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्याबाबत सुषमा यांनी सावध केले आहे. कॅलरीयुक्त स्नॅक्स तुम्ही नियमित खात असाल, तर तुमचे वजन वाढू शकते. त्याशिवाय आहारात पौष्टिकतेची कमतरता भासू शकते. तसेच मधुमेह आणि हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात.
जर तुम्ही जेवल्यानंतर हेल्दी स्नॅक्सचे सेवन केले, तर त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. जेवताना तुम्ही पौष्टिक स्नॅक्स खाल्ले, तर आवश्यक ऊर्जा वाढू शकते. अतिप्रमाणात खाणे टाळू शकता. तसेच फळे, सुका मेवा आणि कडधान्ये खाल्ली, तर हा एक चांगल्या पौष्टिक आहाराचा पर्याय ठरू शकतो.

तुम्हाला सतत स्नॅक्स खायची इच्छा होत असेल, तर खाल्लील गोष्टी समजून घ्या...

तुम्ही स्नॅक्स का खात आहात, याचे कारण जाणून घ्या...
 कंटाळा आला असेल म्हणून खाता का? तणाव जाणवतो म्हणून खाता का किंवा भावनेच्या ओघात खाता का? मूळ कारण जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
जास्तीत जास्त प्रोटीन्स, चांगले फॅट्स, फायबर व कर्बोदकेयुक्त संतुलित आहार घ्या; ज्यामुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहील.

दिवसभर भरपूर पाणी प्या...
त्यामुळे फार भूक लागत नाही आणि सतत खाण्याची इच्छासुद्धा होत नाही.
जर तुम्हाला जेवणानंतर स्नॅ्क्स घ्यायचे असेल, तर आहारात फळे, भाज्या, सुका मेवा, कडधान्ये अशा पौष्टिक पदार्थांचा समावेश करा.

नियमित व्यायाम करा... ध्यान करा. कारण- त्यामुळे तणाव दूर होतो. त्याचबरोबर पुरेशी झोप घ्या. निरोगी जीवनशैलीमुळे सतत खाण्याची इच्छा कमी होते.
खरे तर स्नॅक्स खाणे वाईट नाही; पण स्नॅक्स खाताना त्यामागील कारणे समजून घ्या आणि आरोग्यास फायदेशीर असा स्नॅक्स निवडा. निरोगी जीवनशैली अंगीकारा. संतुलित आणि चांगल्या आहाराशी संबंधित मार्गदर्शनासाठी आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.


जेवण केल्यानंतर तुम्हाला स्नॅक्स खाण्याची सवय आहे का?
Total Views: 27