बातम्या
बहुगुणी नाचणी.....
By nisha patil - 1/6/2024 6:16:09 AM
Share This News:
नाचणी हे आपल्याकडील महत्त्वाचे पीक आहे. आपल्या आरोग्यासाठी याचे अनेक फायदे आहेत. परन्तु अनेक जण कधीतरीच नाचणी खातात. नियमितपणे नाचणी आहारात असेल तर अनेक फायदे होतात. वाढत्या वयाच्या मुलांनी, गर्भवती किंवा स्तनपान देणाऱ्या स्त्रियांनी नाचणी अवश्य खावी.
*१. नाचणी शरीराला काटकपणा आणते. नाचणी खाल्ल्याने अंगकाठी सडसडीत होते. खेड्यातील जे लोक नाचणी खातात ते सडसडीत असतात. नाचणीची भाकरी व ताक घेतल्यास शरीरातील जादाचे फट कमी होतात.
*२. नाचणी पचण्यासाठी अत्यंत हलकी असते. त्यामुळे लहान मुले, वृद्ध मंडळी व आजारातून उठलेल्या व्यक्तींना नाचणीची पेज द्यावी.
*३. नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियम असते. याने हाडे बळकट होतात. वृद्धावस्थेत हाडांचे आजार होत नाहीत. हाडांचा ठिसूळपणा जाणवत नाही.
*४. नाचणीमध्ये फायबरयुक्त पदार्थ भरपूर प्रमाणात आहेत. बद्धकोष्ठता असेल तर दूर होण्यास मदत होते.
*५. नाचणीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. यामुळे रक्तातील साखर एकदम वाढत नाही. डायबेटीस असणाऱ्या व्यक्तींसाठी नाचणी उपयोगी आहे.
*६. नाचणीचे विविध पदार्थ तयार करता येतात. याची पेज, खीर खूप छान लागते. घावन, थालीपिठ हे पदार्थ तयार करताना थोडे नाचणीचे पीठ घालावे. नाचणीची बिस्किटे, शंकरपाळे करता येतात.
बहुगुणी नाचणी.....
|