बातम्या
पुदिना
By nisha patil - 4/7/2024 7:11:54 AM
Share This News:
१) प्राथमिक-
पाणथळ जमिनीत २-३ फुटांपर्यंत वाढणारे व जगात सर्वत्र होणारे व वापरले जाणारे हे झुडूप आहे. याचे खोड चौकोनी असते. हे बहुवर्षीय झाड जमिनीवर व, जमिनीखालीही वाढत असते, त्यामुळे तसे मरत नाही. पाने समोरासमोर येतात.. त्यांची कडा दंतुर असते. पानाचा रंग हिरवा गर्द, निळसर वा अन्यही असतो. रंग, स्वाद व वास यावरून सुमारे २० जाती सांगता येतात. या झाडाला बी नसते.
२) गुणधर्म -
१) कफवातशामक, २) वेदनाहारक, ३) दुर्गंधीनाशक, ४) जंतुघ्न, ५) रुचकर व रुचिवर्धक, ६) पाचक, ७) वासामुळे मनाला सुखकर, ८) स्वादिष्ट, ९) कृमिनाशक, १०) मेदहारक, ११) ज्वरघ्न, १२) विषघ्न, १३) व्रण भरून काढणारे, १४) उलटी थांबवणारे, १५) ग्राही (मलप्रवृत्ती बांधून होणे) १६) मूत्रल, १७) रक्तशुद्धीकर, १८) सूजनाशक,
३) घटक -
१) जीवनसत्त्वे - 'अ', 'क', 'ई', 'के' यांचा उत्तम स्रोत व बीटा कॅरोटिन शिवाय 'बी' कॉम्प्लेक्स असते, त्यात फॉलेट, रिबोप्लेविन, पायरिडॉक्झिन (बी ६) असते. २) क्षार - कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, ३) अन्य घटक - सॅलिसिलिक अॅसिड, २) रोझमेरिक अॅसिड, ३) पेरिलिल अल्कोहोल (Perillyl alcohol), ४) मैथॉल, ५) मेंथॉल अॅसिटेट, ६) मेथोन इ.
४) उपयुक्त भाग -
खोड व पाने
५) वापरण्याची रीत-
१) ताजी पाने - १) तुकडे करून, २) सॅलड, चटणी इ. व ३) उकळून काढा. २) ताजी पाने - रस काढून, रस + मध चाटण.
३) वाळलेली पाने - चूर्ण करून.
६) आरोग्यासाठी फायदे-
१) उचकी - न थांबणारी उचकी ही एक प्रकारची वातजन्य विकृती आहे. केवळ पुदिन्याची चार-पाच पाने खाऊन उचकी थांबते.
२) कफ - खोकला - पुदिन्याचा वास अतिशय तीव्र आहे. केवळ वा घेण्यामुळे नाकपुड्या व श्वासनलिका स्वच्छ होतात.त्यांना आलेली सूज जाते व त्या श्वासमार्गातले जंतू मारतात. त्याचवेळी आतील आवरणाला चिकटलेला खाकेरा/ श्लेष्मा पातळ होऊन बाहेर टाकला जातो. यासाठी पुदिन्याच्या ८-१० पानांचा रस काढून तो गरम पाण्यात टाकून त्याचा वाफारा नाकाने घ्यावा. या गरम वाफेमुळे पुदिन्यामधील कफनाशक द्रव्यांचे काम सुकर होते. जुना कफविकार असेल तर पुदिन्याच्या पानांचा १ ते २ चमचे रस रोज दोन वेळा घ्यावा.
३) कर्करोग प्रतिबंध - पुदिन्यात पेरिलिल अल्कोहोल नावाचे कर्करोग प्रतिबंधक द्रव्य आहे, त्यामुळे अनेक कर्करोगांना दूर ठेवता येते, हे जनावरांवर झालेल्या प्रयोगात सिद्ध झाले आहे. माणसांवर प्रयोग चालू आहेत.
पुदिना
|