बातम्या

आसनाचा राजा म्हणजे शीर्षासन

king of asana


By nisha patil - 5/14/2024 6:32:46 AM
Share This News:



शीर्षासन या आसनाला योगासनामध्ये आसनाचा राजा म्हणून संबोधले जाते. या आसनात संपूर्णशरीराचा भार डोक्यावर तोलला जातो.प्रथम वज्रासनात बसावे. कंबरेतून पुढे वाकावे व दोन्ही हाताची बोटे एकमेकांत गुंफवून जमिनीवर टेकवावी. हाताच करंगळीकडील बाजू व कोपरे जमिनीवर टेल्यावर, हाताच्या तळव्यांनी डोक्याच्या मागचा भाग व टाळू जमिनीला टेकेल या पद्धतीने पुढे वाकावे. त्यानंतर हळूहळू कंबरेकडचा भाग वर घ्यावा. संपूर्ण वजन डोक्यावर घेण्याचा प्रयतत्न करावा. दोन्ही पाय सावकाश वरती घ्यावे. जेवढावेळ स्थिर राहाता येईल तेवढावेळ स्थिर राहावे. शरीराचे वजन डोक्यावर तोलावे. संपूर्ण शरीर ताठ असावे. पाठीला बाक नसावा. श्वसन संथ सुरू ठेवावे. आसन सोडताना सावकाश सोडावे.
 
आसनाचा सराव योग्य मार्गदर्शनाखाली करावा. झटका देऊन करू नये. मानेच दुखणे, रक्तदाब असणार्‍यांनी योग्य सल्ला घ्यावा. उत्तम रक्तपुरवठा होतो. स्मरणशक्ती, एकाग्रता वाढण्यास उपयोगी. संपूर्ण शरीराचे आरोग्य सुधारते.


आसनाचा राजा म्हणजे शीर्षासन