बातम्या
ना. हसन मुश्रीफ फाउंडेशनकडून उत्तूर ग्रामपंचायतीला सव्वा सहा लाखांची मदत
By nisha patil - 4/3/2025 5:12:31 PM
Share This News:
ना. हसन मुश्रीफ फाउंडेशनकडून उत्तूर ग्रामपंचायतीला सव्वा सहा लाखांची मदत
उत्तूर (ता. आजरा) – ग्रामपंचायतीच्या साडेबारा लाख रुपयांच्या थकीत वीजबिलामुळे जलजीवन योजनेच्या विद्युत कनेक्शनला अडथळा निर्माण झाला होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी ना. हसन मुश्रीफ फाउंडेशनकडून सव्वा सहा लाख रुपयांचा धनादेश ग्रामपंचायतीला देण्यात आला. उर्वरित रक्कम ग्रामपंचायतीकडून भरल्यानंतर जलजीवन पाणीपुरवठा योजनेच्या विद्युत जोडणीचा मार्ग मोकळा होणार आहे.
सरपंच किरण अमनगी यांनी सांगितले की, १५ हजार लोकसंख्येच्या गावासाठी आंबेओहोळ प्रकल्पावरून जलजीवन योजना अंतिम टप्प्यात आहे. मात्र, थकीत वीजबिलामुळे नवीन कनेक्शन मिळणे अडचणीचे झाले होते. ना. हसनसाहेब मुश्रीफ यांच्या सहकार्यामुळे हा अडथळा दूर झाला असून लवकरच उत्तूरवासीयांना स्वच्छ आणि मुबलक पिण्याचे पाणी मिळणार आहे.
यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ना. हसन मुश्रीफ फाउंडेशनकडून उत्तूर ग्रामपंचायतीला सव्वा सहा लाखांची मदत
|