बातम्या
"राज्यात उन्हाचा तडाखा! 43.2 अंश तापमानाची नोंद"
By nisha patil - 7/4/2025 4:21:08 PM
Share This News:
"राज्यात उन्हाचा तडाखा! 43.2 अंश तापमानाची नोंद"
राज्यात तापमानात झपाट्याने वाढ होत असून अकोल्यात सर्वाधिक 43.2 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामानामुळे येलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाने पुढील चार दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव वाढत असून काही भागांत गारपीट आणि ढगाळ वातावरणही पाहायला मिळत आहे.
मुंबई, कोकण, मराठवाडा व विदर्भातील अनेक शहरांमध्ये तापमान 40 अंशांच्या पुढे गेले असून, नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
"राज्यात उन्हाचा तडाखा! 43.2 अंश तापमानाची नोंद"
|