बातम्या

बालिंगा सबस्टेशनवर काम , सोमवारी शहरातील पाणी पुरवठा बंद

water supply in the city stopped on Monday


By nisha patil - 1/18/2025 3:12:10 PM
Share This News:



बालिंगा सबस्टेशनवर काम , सोमवारी शहरातील  पाणी पुरवठा बंद

महावितरण कडून बालिंगा सब स्टेशनच्या 33 केव्ही मुख्य वीज वाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचे कामकाज सोमवारी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवार, दिनांक 20 जानेवारीला विद्युत पुरवठा बंद रहाणार होणार असल्याने पाणी उपसा होऊ शकणार नाही. सोमवारी होणारा पाणी पुरवठा बंद राहिल व मंगळवारी कमी  दाबाने अपुरा पाणीपुरवठा होईल.अशी माहिती महापालिकेनं दिलीय.

यामध्ये ए, बी, वॉर्ड त्यास सलग्नीत उपनगरे, ग्रामीण भाग व शहरी अंतर्गत येणा-या लक्षतीर्थ वसाहत, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरुजी वसाहत, राजेसंभाजी, क्रशर चौक, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतीसिंहनाना पाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंभे रोड, शिवाजीपेठ,चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम परिसर, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाव्दार रोड, मंगळवार पेठ काही भाग. संपूर्ण सी डी वॉर्ड, दुधाळी, गंगावेश, उत्तरेश्वरपेठ, शुक्रवार पेठ, ब्रम्हपुरी, बुधवार पेठ, सिद्धार्थनगर, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफीस, बिंदुचौक, कॉमर्स कॉलेज, आझाद चौक, उमा टॉकीज,महालक्ष्मी मंदीर परिसर, गुजरी, मिरजकर तिकटी, देवल क्लब व त्यास सलग्नित ग्रामिण भाग व उपनगरे तसेच ई वॉर्ड अंतर्गत खानविलकर पेट्रोलपंप परिसर, शाहूपुरी 5, 6, 7 व 8 वी गल्ली, कुंभार गल्ली व बागल चौक इत्यादी भागात भागामध्ये दैनंदिन होणारा पाणी पुरवठा बंद राहील. तरी सोमवारी नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.


बालिंगा सबस्टेशनवर काम , सोमवारी शहरातील पाणी पुरवठा बंद
Total Views: 49