बातम्या

रोज 10 मिनिट हे योगासन, लहान मुलांकडून करून घ्या

yoga asana daily for 10 minutes


By nisha patil - 9/5/2024 7:26:37 AM
Share This News:



लहानपणापासून मुलांना चांगले गुण शिकवले जातात तसेच संस्कार केले जातात. म्हणजे पुढे जावून ते चांगले व्यक्तिमत्व निर्माण करू शकतील. तसेच सर्व आई-वडील आपल्या मुलांना चांगल्या सवयी लावतांना दिसतात. चांगले जेवण, योगा, व्यायाम, ध्यान अजून बऱ्याच चांगल्या गोष्टी आहे ज्यांच्या बद्द्ल लहान मुलांनी समजून घेतले पाहिजे. मुलांच्या दैनंदिन जीवनात योग नक्कीच सहभागी करा. योग केल्याने लहानमुलांमध्ये शारीरिक तसेच मानसिक विकास होतो. योग लहान मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतो. तर चला जाणून घ्या असे दोन योगासन जे लहान मुलांना अनेक प्रकारचे फायदे देतात. ताडासन- सर्वात आधी पायांना मोकळे करून सरळ उभे रहा. आता हाताच्या बोटांना एकमेकांना जोडून डोक्याच्या वरती न्यावे तसेच हातांना आपल्या कानाच्या जवळून नेऊन वरती न्यावे. आता हाताच्या बोटांना  आणि शरीराला वरती ओढावे. या दरम्यान आपल्या टाचेला वरती करावे आणि पंजावर उभे रहावे. तसेच श्वास घ्यावा. अश्याच अवस्थेत थोडा वेळ रहावे. आता आधीच्या स्थितीत परत यावे. हे योगासन तुम्ही दिवसभरात  मुलांकडून 2 ते 3 वेळेस करून घेऊ शकतात. असे केल्याने मुलांची भूक वाढते. आणि शरीराला योग्य पोषण मिळते. यामुळे शारीरिक शक्ती वाढते. पोटाच्या स्नायू  मजबूत होतात. पाचनक्रिया सुधारते. 
 
वृक्षासन- उजव्या पायाच्या तळव्याला डाव्या मांडीवर ठेवा. असे करतांना तुमची टाच वरती आणि पंजे खालच्या बाजूला हवे. डाव्या पायावर शरीराचे वजन टाकणे सरळ उभे राहण्याचा प्रयत्न करावा. आता दोन्ही हातांना डोक्याच्या वरती घेऊन जा मग मोठा आणि दीर्घ श्वास घ्यावा. डोक्याच्या वरती नमस्कार मुद्रामध्ये यावे. काही सेकंड याच मुद्रामध्ये रहावे. आता श्वास सोडून पूर्वीच्या स्थितित यावे. हे 2 ते 3 वेळेस करावे. यामुळे मुलांची ऊंची वाढण्यास मदत होते. यामुळे शरीराला संतुलन येते तसेच स्ट्रेस देखील कमी होतो. आणि पायाच्या स्नायू  मजबूत होतात.


रोज 10 मिनिट हे योगासन, लहान मुलांकडून करून घ्या