बातम्या

दोनदा दात घासणे हृदयासाठी फायदेशीर?

your teeth twice good for your heart


By nisha patil - 7/18/2024 7:41:54 AM
Share This News:



दिवसातून दोन वेळा दात घासावे हे आपल्यावर अगदी लहान पणापासून बिंबवले जाते. घरातील वडीलधारे देखील वर्षानुवर्षे तेच सांगत आलेत. एवढेच काय टीव्हीवरील जाहिराती देखील आपल्याला दोन वेळा दात घासण्याचा सल्ला देतात. पण तुम्हला महिती आहे का? दोनदा दात घासल्याने फक्त दातच नाही तर हृदयही निरोगी राहण्यास मदत होते, असे एका संशोधनात दिसून आले आहे.
हृदयासाठी दोन वेळा दात घासणे उत्तम 
शिकागोत झालेल्या अमेरिकन हार्ट असोसिएशन्स सायंटिफिक सेशनच्या बैठकीत हे संशोधन मांडण्यात आले. संशोधकांनी ६८२ लोकांच्या दात घासण्याच्या सवयीबाबत जाणून घेतलं. इतर सर्व गोष्टींचा विचार करता, संशोधकांना दिसून आले दिवसाला किमान २ वेळा आणि कमाल २ मिनिटं दात घासणाऱ्यांच्या तुलनेत दिवसाला २ वेळापेक्षा कमी आणि २ मिनिटांपेक्षा कमी दात घासणाऱ्या व्यक्तींना हृदयाच्या आजाराचा धोका तिपटीने बळावतो.
संशोधनाचे मुख्य अभ्यासक डॉ. शोगो मटसुई म्हणाले, दात घासण्याच्या सवयींवर मौखिक आरोग्य अवलंबून असतं आणि मौखिक आरोग्याचा संबंध हा हृदयाच्या आजाराशी संबंधित आहे. त्यामुळे जास्त वेळा दात घासल्याने हृदयाच्या आजाराचा धोका कमी होण्याची शक्यता आहे. मात्र या संशोधनात याची कारणे आणि परिणामाचा अभ्यास केलेला नाही आहे. त्यामुळे हे संशोधन मर्यादित आहे.
दरम्यान हिरड्यांचे आजार आणि दातांना हानी यांसारख्या मौखिक आजारांचा आणि हृदयाच्या आजारांचा संबंध असल्याचे याआधीच्या संशोधनात सिद्ध झालेले आहे. तर नव्या संशोधनानुसारही दात घासण्याची सवय हृदयासाठी किती फायदेशीर ठरते हे दिसून आले आहे. जरी या संशोधनाला काही मर्यादा असल्या तरी दात घासण्याची सवय वाईट नाही. त्यामुळे तुम्हीही दिवसातून दोन वेळा किमान २ मिनिटं दात घासा.


दोनदा दात घासणे हृदयासाठी फायदेशीर?